सनातनची ज्ञानगंगा !

पू.श्री. संदीप आळशी
पू. श्री. संदीप आळशी

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या माध्यमातून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी ज्ञानगंगा अवतरित झाली आहे ! सनातन संस्थेच्या ग्रंथांनी आता २०० चा टप्पा गाठला आहे ! धर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आयुर्वेद आदींविषयीच्या या २०० ग्रंथांच्या ११ भाषांत ५३ लाख ३८ सहस्रांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या औचित्यप्रसंगी सनातनच्या ग्रंथसंपदेची मौलिकता दर्शवणारा हा लेख...

मी... सनातनचे ग्रंथविश्व...प.पू. डॉक्टरांचा धर्मदूत !

माझी वंशवेल !

माझी वंशपरंपरा प्राचीन आहे. माझ्या पूर्वजांचा जन्म अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच झाला होता. तपस्वी ऋषिमुनींना आत्मसाक्षात्कार झाला आणि धर्मज्ञान देणार्‍या वेदांचा प्रथम जन्म झाला. पुढे युगे सरकत गेली, तसतशी दर्शने, रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, पुराणे अशी आमची वंशवेल वाढत गेली. त्या त्या काळाला आवश्यक असे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त अशा धर्मग्रंथांची निर्मिती भारतवर्षात होत राहिली. संत-महात्मे, राष्ट्रपुरुष आणि थोर विचारवंत यांनीही विविध ग्रंथांची रचना केली. ज्ञानेश्वरमाऊलींची‘ज्ञानेश्वरी’, जगद्गुरु तुकाराम महाराजांची ‘तुकाराम गाथा’, समर्थ रामदासस्वामींचा ‘दासबोध’ यांसारख्या ग्रंथांतून ब्राह्मतेज प्रगटत राहिले आणि आर्य चाणक्य यांचा ‘चाणक्यनीती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, बाबासाहेब पुरंदरे यांचा ‘राजा शिवछत्रपती’यांसारख्या ग्रंथांतून क्षात्रतेज प्रगटत राहिले. ब्राह्मतेजयुक्त ग्रंथांनी समाजाला हिंदु धर्म शिकवला आणि साधना सांगून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवण्याचे महत्कार्य केले. क्षात्रतेजयुक्त ग्रंथांनी निदि्रस्त हिंदू समाजमनात राष्ट्र,धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाची ज्योत प्रज्वलित करून क्रांती घडवण्याचे तेवढेच मोलाचे कार्य केले.

माझे ग्रंथ : जणू आधुनिक काळातील गीता' !

श्रीमद्भगवद्गीताया ग्रंथाचे वैशिष्ट्य काय ? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।, म्हणजे सर्व प्रकृतीधर्मांचा, षड्रिपूंचा अन् अहंचा त्याग करून एकट्या मला शरण ये, असा उपदेश करणारा गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य आणि मार्ग दर्शवतो. त्याचसह सगेसोयरे, गुरुजन, पितामह इत्यादी समोर उभे ठाकले, तरी ते अधर्माच्या बाजूने असल्याने त्यांचा वध करणे, हे धर्मपालनच आहे; म्हणून उति्तष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः, म्हणजे ऊठ अर्जुना, धर्मयुद्धास सज्ज हो, असेही निक्षून बजावतोभगवंताची ही गीताम्हणजे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा आदर्श समन्वयच आहे.

समाज अध्यात्ममार्गी, धर्माचरणी बनला, तर नीतीमत्ता, चारित्र्यशीलता, बंधूभाव, कर्तव्यदक्षता आदी गुणांचा त्याच्यात विकास होऊन सामाजिक स्थैर्य लाभते. त्याचसह अन्याय, अधर्म आदींच्या विरुद्ध लढलो, तरच राष्ट्रीय जीवनात भ्रष्टाचार, गुंडगिरी, सामाजिक विषमता यांसारख्या दुर्गुणांवर चाप बसून राष्ट्र सुरकि्षत आणि सुव्यवसि्थत रहाते. यासाठीच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा सुयोग्य समन्वय असणे आवश्यकच असते. माझे ग्रंथही (सनातनचे ग्रंथही) आधुनिक काळाला आवश्यक असणारे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची शिकवण देत आहेत. त्यामुळे हे ग्रंथ म्हणजे जणू आधुनिक काळातील गीताच होत !

अनुभवसिद्ध ज्ञानातून साकारणारे अनमोल विचारधन !

संस्कृती टिकते ती अनुभवसिद्ध वाङ्मयामुळे. हे अनुभवाचे बोल असलेले वाङ्मय पुढील कित्येक पिढ्यांना तारक ठरते. अनुभवसिद्ध साहित्य-संस्कृती ज्यांनी जोपासली, त्यांचे नाव अजरामर झाले आणि ते दीपस्तंभ बनून या जगात मार्गदर्शक ठरले. आद्य शंकराचार्य, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासस्वामी आदींच्या वाङ्मयात अनुभव ओतप्रोत भरलेला आहे. या विभूतींप्रमाणेच प.पू. डॉक्टरांनी लिहिलेले ग्रंथ मार्गदर्शक आहेत; कारण संतांनी विविध प्रसंगी शिकवलेले अध्यात्म, अध्यात्म जगतांना स्वतःला आलेले अनुभव, त्या अनुभवांचे केलेले विश्लेषण, प्रयोगशीलतेतून अर्जित केलेले ज्ञान इत्यादींनी ते समृद्ध आहेत.

अध्यात्मजगतातील विविध दालने उघडणारे ग्रंथ !

माझे ग्रंथ सर्वांगस्पर्शी आहेत. कर्मकांडांप्रती आस्था असणार्‍यांना धर्मशास्त्र प्रतिपादन करणारे ग्रंथ उपयुक्त ठरतात. उपासनाकांडातील साधकांना भक्तीप्रचूर करणारे ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. कलेची रुची असणार्‍यांना साति्त्वक कला कशी जोपासावी, याविषयीचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शिकायला मिळतो. राष्ट्र आणि धर्म जागृतीसंबंधीचे ग्रंथ हिंदू समाजाला सर्वदृष्ट्या आदर्श असणारे हिंदू राष्ट्रस्थापण्याविषयी दिशादर्शन करतात. बालसंस्कार, मुलांचा विकास, आयुर्वेद असे जीवनाच्या आणि साधनेच्या प्रत्येक अंगाविषयीच व्यापक आणि सखोल मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत.

ग्रंथांची मांडणी काळानुसार वैज्ञानिक परिभाषेत !

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदासस्वामी आदी संतांनी अभंग, भजने, श्लोक इत्यादींची निर्मिती करून समाजाला ईश्वरप्राप्तीविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. त्या काळी आताच्या तुलनेत समाजाची साति्त्वकता अधिक होती. त्यामुळे अल्प शब्दांतूनही समाजाला अध्यात्म समजत असे. आज समाजाची साति्त्वकता न्यूनतम स्तरावर पोहोचली असल्याने अध्यात्म समजून घेण्याची समाजाची कुवतही अल्प झाली आहे. त्यामुळे समाजाला अध्यात्माच्या सर्व अंगांचे विश्लेषण करून सांगावे लागते. त्याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभावे ।हेच आताच्या समाजाला कळण्यासाठी पुढीलप्रमाणे विश्लेषण करून सांगावे लागते -

. बोलावा विठ्ठल : नामजप कोणता करावा ?, तो करण्याची योग्य पद्धत कोणती ? इत्यादी.

. पहावा विठ्ठल : दुसर्‍यामध्ये देव पहाता येण्यासाठी स्वतःमध्ये भाव कसा निर्माण करावा ? त्याकरता स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न करायचे ? इत्यादी.

. करावा विठ्ठल जीवभावे : साधना टप्प्याटप्प्यानुसार कशी करावी ? इत्यादी.

माझ्या ग्रंथांत अध्यात्माच्या सर्व अंगांचे वरीलप्रमाणे विश्लेषण करून सांगितले असल्याने ते सध्याच्या काळाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. तसेच आधुनिक पिढीला विज्ञानाच्या भाषेत समजवल्यास तिला ज्ञानाचे आकलनही लवकर होते. माझे ग्रंथ वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म शिकवत असल्याने या दृष्टीनेही ते सध्याच्या समाजाला उत्कृष्ट मार्गदर्शन करतात.

आपत्काळाचाही विचार !

भूकंप, वादळ, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्ती आणि अराजक, अणूयुद्ध अशा मानवनिर्मित आपत्ती आल्यास मनुष्यहानी अन् वित्तहानी प्रचंड प्रमाणात होते. दोन वेळचे जेवणही मिळायला जेथे कठीण असते, तेथे औषधोपचार उपलब्ध होणे तर पुष्कळ दूरचे. अशा आपत्काळात आपत्काळासाठी आयुर्वेदयांसारखे माझे ग्रंथ, हे पीडितांसाठी नवसंजीवनीच ठरतील. मानवजातीच्या कल्याणासाठी एवढा दूरदृष्टीचा विचार द्रष्टे प.पू. डॉक्टरच करू शकतात !

भावी 'अध्यात्म विश्वविद्यालया’चा पाया असलेले ग्रंथ !

राष्ट्र आदर्श घडवायचे असेल, तर श्रेष्ठ नीतीमूल्यांचे शिक्षण देणारी, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रत्येक अंगाचा सखोल विचार करणारी शिक्षणव्यवस्था उभारणे आवश्यक असते. या शिक्षणव्यवस्थेमध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त महापुरुष घडवण्याची क्षमता असते. वसिष्ठऋषींकडून असे शिक्षण घेऊन प्रभु श्रीरामचंद्र घडले आणि त्यांनी असुरांचे निर्दालन करण्यासह आदर्श रामराज्यस्थापिले. तक्षशिला विद्यापिठात शिक्षण घेऊन आचार्य चाणक्य घडले आणि त्यांनी दुष्ट मगधपती नंदराजाला सत्ताच्युत करवून जनतेला मौर्यांची सि्थर राजवट देण्याचे कार्य केले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील.

असेच शिक्षण देण्यासाठी भावी काळात अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करणे, हे सनातन संस्थेचे ध्येय आहे. माझे ग्रंथ हे त्या अध्यात्म विश्वविद्यालयाचा पाया आहेत. यासाठी धर्मशास्त्राच्या जोडीलाच राजनीतीशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र अशा सर्वच अंगांचा विचार करणारे ग्रंथ सिद्ध करणे, हे सनातनचे ध्येय आहे. अध्यात्म विश्वविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी केवळ संत नसतील, तर राष्ट्रसंत असतील. हिंदू राष्ट्रनिष्कंटक राखण्यासह त्याचे तेज आणि असि्मता वाढवणारे ते महापुरुष असतील !

माझ्या ग्रंथांचा प्रसार करून तुम्हीही राष्ट्र आणि धर्म यांच्या पवित्र कार्यात सहभागी व्हा !

माझे ग्रंथ घरोघरी, शाळाशाळांत आणि वाचनालयांत पोहोचवणे; ते इतरांना भेटस्वरूपात देणे; त्यांच्यासाठी प्रायोजक बनणे वा विज्ञापने देणे यांसारख्या विविध मार्गांनी तुम्हीही ग्रंथांचा प्रसार करू शकता. याद्वारे तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांच्या पवित्र कार्यात सहभागी होऊ शकता अन् जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळवू शकता !

 

- पू. श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(फाल्गुन शुद्ध पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११४ (१८ मार्च २०१३) )