‘सनातन शॉप’वर ऑनलाईन ग्रंथ खरेदी करण्यासाठीचे टप्पे१. ग्रंथ खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाचे खाते (लॉग-इन) तयार करणे आवश्यक असते. आपण सनातन शॉपवर यापूर्वी खाते उघडले असेल, तर थेट ‘लॉग-इन’ होऊन ग्रंथ खरेदी करू शकता.

२. ग्राहकाला खाते उघडावयाचे असल्यास सनातनच्या पानावरील उजव्या कोपऱ्यात ‘मेनूबार’खाली  ‘गो -इन’ वर क्लिक करून आपल्या खात्यात प्रवेश करा. (तुमचे खाते नसल्यास ते उघडण्याठी  संगणकीय पत्ता (इ-मेल) देऊन त्याखालील ‘तुमचे खाते निर्माण करा', या बटणावर क्लिक करून  विचारलेली माहिती भरून तुम्ही थेट तुमच्या खात्यात प्रवेश करू शकता.) सांकेतिक शब्द (‘पासवर्ड’) विसरला असल्यास ‘सांकेतिक शब्द (पासवर्ड) विसरलात का ?' या वाक्यावर क्लिक  केल्यास तुम्हाला तुमचा संगणकीय पत्ता (इ-मेल) मागितला जाईल. तो दिल्यावर तुमच्या लॉग-इनची माहिती देणारा इ-मेल तुम्हाला मिळेल. (टीप  : ‘स्पॅम' मेल तपासायला विसरू नका.)

३. तुमच्या खात्यात प्रवेश केल्यावर ग्रंथ खरेदीकरिता शेवटचा पर्याय ‘मुख्य पान' निवडा.

४. ग्रंथ निवडल्यावर त्याची योग्य संख्या (नग) ‘क्वांटिटी' या बॉक्समध्ये अंतर्भूत केल्याची खात्री करून ‘कार्टमधे समाविष्ट करा', या बटणावर क्लिक  करा.

५. वरीलप्रमाणे ग्रंथ खरेदी झाल्यानंतर डाव्या स्तंभात वर ‘निवडलेले ग्रंथ (कार्ट)' अशी चौकट दिसेल. ती तपासून खात्री केल्यावर ‘चेक आऊट' या बटणावर क्लिक करा.

६. आता ‘तुमची खरेदी' या पानावर तुम्ही निवडलेल्या (कार्टमधील) ग्रंथांची बेरीज / तपशील (टॅबूलर फॉर्ममध्ये) पहाता येईल. येथे ‘संख्या’ या स्तंभात आपल्याला हव्या असलेल्या ग्रंथांची संख्या (नग) थेट येथूनच कमी-जास्त करू शकतो.

७. आणखी ग्रंथ खरेदी करावयाची असल्यास ‘टीप' या स्तंभात ‘खरेदी चालू ठेवा' या बटणावर क्लिक करा.

८. नंतर ‘तुमचे पत्ते' या पर्याय क्र. १ अंतर्गत ‘पावतीसाठीr / देयकासाठी दिलेल्या पत्त्याचा वापर करा !' या चौकटीत (बॉक्समधे) क्लिक करून मागणी पोहोचवण्याचा पत्ता निश्चित करा.

अ. तुमच्या आहे त्या पत्त्यात पालट सुचवायचा असल्यास ‘अद्ययावत् करा' या पर्यायावर क्लिक करा.

आ. पत्ता पालटला असल्यास ‘नवीन पत्ता समाविष्ट करा' या बटणावर क्लिक करा.

९. ‘साहित्य / वस्तू पोहोचवण्याच्या पद्धती’ या दुसऱ्या पर्यायात दिल्याप्रमाणे ‘भारतीय डाक'ने साहित्य / वस्तू तुम्हाला पोहोचवले जाईल. या संदर्भात तुमच्या काही सूचना असल्यास दिलेल्या चौकटीत (बॉक्समधे) टंकलिखित करू शकता.

१०. सेवेच्या अटी मान्य करण्यासाठी तेथे दिलेल्या चौकटीत (बॉक्समधे) क्लिक केले असता पर्याय क्र. ३ मधील ‘तुमची रक्कम भरण्याची पद्धत निवडा' यातील रक्कम भरण्याचे दोन पर्याय दिसतील.

अ. ‘बँक ट्रान्सफर' या पर्यायावर क्लिक केल्यास ‘बँक वायर पेमंट'ची ऑर्डर समरी दिसेल. आता तुमची खरेदी निश्चित करण्यासाठी ‘आय कन्फर्म माय ऑर्डर'वर क्लिक करा. तुमची ऑर्डर पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल. (‘यूवर ऑर्डर ऑन सनातन शॉप इज कंप्लीट.’)  

आ. येथे दिलेल्या सूचनेनुसार ‘बँक वायर' ने पेमंट करू शकतो. तुमच्या मागणीचे देयक तुमच्या संगणकीय पत्त्यावर (ई-मेल अ‍ॅड्रेसवर) मिळेल.

इ. ‘कॅश ऑन डिलिवरी' या पद्धतीवर क्लिक केल्यास ‘कॅश ऑन डिलिवरी पेमेंट'ची विन्डो उघडेल. येथे तुमची मागणी निश्चित करण्यासाठी ‘आय कन्फर्म माय ऑर्डर' वर क्लिक करा. तुमची ऑर्डर पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल. (‘यूवर ऑर्डर ऑन सनातन शॉप इज कंप्लीट.’) तुमच्या मागणीचे देयक तुमच्या संगणकीय पत्त्यावर (ई-मेल अ‍ॅड्रेसवर) मिळेल.