‘सनातनची राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांविषयीची अनमोल ग्रंथसंपदा’ आता www.SanatanShop.com या संकेतस्थळावर उपलब्ध !

     प्रत्येक मनुष्याला सुखाची (Happinessची) नव्हे, तर आनंदप्राप्तीची (Blissची) एक आंतरिक ओढ असते. या आनंदप्राप्तीसाठी त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभल्यास त्या जिवाचा उद्धार होतो. असे मागदर्शन करण्यासाठी पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत, तसेच गुरु होते. अलीकडच्या काळात समाजाच्या घसरलेल्या सात्विकतेमुळे खरे गुरु लाभणे महाकर्मकठीण झाले आहे. अशा वेळी कोट्यवधी जिज्ञासू जिवांसाठी ‘ग्रंथ हेच गुरु’ ठरतात. ‘सनातन’ची अलौकिक ग्रंथसंपदा समाजाची ही निकड पूर्ण करते.

‘सनातन ग्रंथसंपदे’चे अध्वर्यू प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी
अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी शेकडो ग्रंथांची निर्मिती करणे

     ‘सनातन संस्थे’चे स्फूर्तीस्थान प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी अध्यात्मशास्त्रासह आयुर्वेद, समाज, राष्ट्र, धर्म इत्यादीं विषयी शेकडो ग्रंथ निर्मिले. याद्वारे त्यांनी वेद, उपनिषद, पुराणे, विविध शास्त्रांमधील अध्यात्मशास्त्र सर्वसामान्यांना कळेल, अशा सहज आणि सोप्या भाषेत मांडले आहे. त्याचसह ‘सनातन’च्या अनेक साधकांना वरील विविध विषयांवर सूत्रे (मुद्दे) स्फुरत असून ही सूत्रे हे सनातनच्या ग्रंथसंपदेचे वैशिष्ट्य होय. ‘सनातन ग्रंथसंपदे’चा लाभ आज जगभरातील लक्षावधी लोकांना होत आहे. प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही आजही प.पू. डॉक्टर अशा अनेक ग्रंथांचे लिखाण अहोरात्र करत आहेत.

आधुनिक काळाची आवश्यकता - ‘सनातन शॉप’ !

      आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेअभावी ‘ऑनलाईन’ खरेदीकडे करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. प्रत्येकाला एखाद्या ठिकाणी जाऊन ग्रंथ घेणे शक्य होईलच, असे नाही. जिज्ञासू ज्ञानापासून वंचित राहू नयेत; म्हणून सनातनची ग्रंथसंपदा आता ‘www.SanatanShop.com’ या संकेस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अन् अत्यंत सुलभ पद्धतीने हाताळणी करता येऊ शकेल, अशी या संकेतस्थळाची रचना करण्यात आली आहे. वर्ष २०१२ मधील दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी प.पू. पांडेमहाराज यांच्या हस्ते ‘सनातन शॉप’चे लोकार्पण झाल्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. अधिकाधिक जिज्ञासूंनी अध्यात्मशास्त्र जाणून त्यानुसार कृती करून स्वतःचे जीवन आनंदी करून घ्यावे, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.