आत्मज्ञान प्राप्त करून देणार्‍या सनातनच्या ग्रंथसंपदेचा लाभ घ्या !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज

सनातनचे संत प.पू. पांडे महाराज यांनी सनातनच्या ग्रंथसंपदेचे अनमोल शब्दांत वर्णन केले आहे. यांतून आपल्याला सनातनच्या ग्रंथांची सरसता लक्षात येईल. खालील वैशिष्ट्ये वाचून अधिकाधिक जणांनी सनातनच्या ग्रंथांचा लाभ करून घेऊन, त्यातील ज्ञान कृतीत आणून स्वतःच्या मनुष्य जीवनाचे सार्थक करून घ्यावे हीच अपेक्षा !

 

१. वैशिष्ट्ये

१ अ. अध्यात्म आणि धर्म यांच्या संदर्भात माहिती देणारे सनातनचे ग्रंथ ! : ‘सनातनच्या ग्रंथांमुळे अध्यात्म आणि धर्म यांच्या संदर्भातील आवश्यक ती सर्व माहिती मिळते. ग्रंथांच्या अनुक्रमणिकेत दिलेल्या प्रकरणांच्या मथळ्यांतून आपल्याला संपूर्ण ग्रंथाची समग्र कल्पना येते.

२. अनुभूती

पुढील अनुभूती हजारो साधकांना आणि वाचकांना आल्या आहेत.

२ अ. केवळ ग्रंथ हातात घेतल्यावर वेगळीच अनुभूती येते. ग्रंथ वाचतांना आनंदही जाणवतो.

२ आ. ग्रंथ वाचल्यावर त्या विषयासंदर्भात आत्मविश्वासही वाढणे : ग्रंथ वाचल्यानंतर मनात असलेला त्या विषयाच्या संदर्भातील भ्रम नाहीसा होऊन शंकानिरसन झाल्याने समाधान मिळते, प्रसन्न वाटते. साहजिकच आपला आत्मविश्वासही वाढतो.

२ इ. ग्रंथ उशीखाली घेऊन झोपल्यास झोपही चांगली लागते. ग्रंथ काही वेळ डोक्यावर ठेवल्यास वाटणारी अस्वस्थता दूर होते.

२ ई. घरात सनातनची ग्रंथसंपदा असल्यास घरातील वातावरण प्रसन्न रहाते.

३. ज्ञानाचे महत्त्व

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्ध कालेनात्मनि विन्दति ।।

- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ३८

अर्थ : या विश्वात अध्यात्मज्ञानासारखे विशुद्ध, पवित्र आणि उदात्त असे काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्तीयोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे आणि भक्तीभावामुळे शुद्ध होऊन ज्याचे अंतःकरण शुद्ध अन् निर्मळ झाले आहे, तसेच जो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते.

४. प्रत्येक घरी सनातनच्या ग्रंथांचे वाचनालय हवे !

प्रत्येक घरी सनातनच्या ग्रंथांचे वाचनालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनातील अध्यात्माविषयीच्या शंकाकुशंका नाहीशा होऊन वाचणार्‍यांना विशुद्ध ज्ञान मिळेल.

५. अध्यात्मज्ञान ही खरी जीवन आनंदमय करणारी धनसंपदा !

सनातनच्या ग्रंथांमध्ये दिलेले अध्यात्मज्ञान हीच खरी धनसंपदा आहे. ज्या ग्रंथांमुळे मानवाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होते, असे ग्रंथ संग्रही असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यक्ती वाईट मार्गापासून परावृत्त होऊन सन्मार्गाला लागते आणि तिचे जीवन आनंदमय होते.

६. मासिक प्राप्तीतून सनातनचे ग्रंथ खरेदी करा आणि पुढील पिढी चारित्र्यवान घडवा !

प्रत्येकाने आपल्या मासिक प्राप्तीतील काही भाग सनातनच्या ग्रंथ-खरेदीसाठी ठेवला पाहिजे; कारण आपण सध्या जी संपत्ती जमा करत आहोत, ती आपल्या पुढील पिढ्यांना सामर्थ्य देत नसून पांगळे बनवत आहे. नीतीमत्ता सोडून गोळा केलेली संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांना नीतीमत्ताहीन आणि चारित्र्यहीन बनवत आहे. अशा पिढ्या त्यांच्या धनदांडग्या संपत्तीसह लयासही जात आहेत, हे आपण प्रत्यक्ष पहात आहोत. आपल्या पुढील पिढ्यांवर चांगले संस्कार करायचे असतील, त्यांना खरोखरच ऐश्वर्य आणि सुख- समृद्धी प्रदान करायची असेल, तर सनातनचे ग्रंथ खरेदी करा, ते वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा !

७. सनातनरूपी ग्रंथसंपदेतून होईल हिंदू राष्ट्राचे अवतरण ।

कलियुगी अवतरली सनातनरूपी ग्रंथसंपदा ।
मानव कल्याण करण्या देऊनी ज्ञानदान संपदा ।।
करी सद्विचारांचे प्रक्षेपण, करूनी आनंदाची उधळण ।
त्याद्वारे होईल हिंदू राष्ट्राचे अवतरण ।।

- प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.