सनातनच्या चैतन्यमय ग्रंथसंपदेची ठळक वैशिष्ट्ये
१. आध्यात्मिक विषयांवरील विविध ग्रंथांतील सुमारे ३० टक्केलिखाण हे अन्य संदर्भग्रंथांतील लिखाण आहे, सुमारे २० टक्के लिखाण हे साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ईश्वरी ज्ञान आहे, तर ५० टक्केलिखाण ग्रंथांच संकलक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गुरूंच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे.
२. अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयी ‘का अन् कसे ?’ यांची शास्त्रीय उत्तरे !
३. विज्ञानयुगातील वाचकांना सहज समजेल अशा आधुनिक वैज्ञानिक भाषेतील (उदा. टक्केवारी सांगणे) ज्ञान !
४. अध्यात्मातील विविध गोष्टींच्या संदर्भात वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधन, सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी चित्रे आणि लिखाण !
५. साधनेविषयीचे तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !
६. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी योग्य साधनेची शिकवण !
७. अध्यात्म समजवण्यासाठी निरनिराळ्या साधनामार्गांचे तुलनात्मक विवेचन !