योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत (साधना, कर्म, भक्ती आदींविषयी मार्गदर्शन !)

122

योगतज्ञ दादाजी यांना वाचासिद्धि (बोलण्यानुसार घडणे) प्राप्त होती. ते आवश्यक तेवढेच आणि मोजक्या शब्दांत बोलत अन् तेच त्यांचे मार्गदर्शन ठरे. त्या मार्गदर्शनात अध्यात्माचे सारच येत असे.

योगतज्ञ दादाजी यांचे लिखाणही मोजक्या शब्दांत असे. त्यांनी वेळोवेळी विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींतून ‘जीवन कसे जगावे ?, साधना, भक्ती, योगमार्गांचे महत्त्व’ इत्यादी अनेक विषयांवर लिखाण केले. हे लिखाण केवळ विविध साधनामार्गांनुसार साधना करणार्‍यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य लोकांसाठीही उपयुक्त आहे. ‘या लिखाणातील ज्ञान अनुभूतीजन्य आहे’, असे जाणवते. या लिखाणावरून योगतज्ञ दादाजी यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीची कल्पनाही येते.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची दैवी वाणी आणि लेखणी यांतून प्रगट झालेले मौलिक सुविचार अन् मार्गदर्शन प्रस्तुत ग्रंथात देण्यात आले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत (साधना, कर्म, भक्ती आदींविषयी मार्गदर्शन !)

122