सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?

20

मनुष्याचे मन स्वभावतःच अस्थिर असते. एका ठिकाणी बसून घंटोन्घंटे (तासन्तास) नामजप करणे, ध्यानधारणा करणे यांसारख्या साधनाप्रकारांमध्ये मनाला एकाच ठिकाणी स्थिर करावे लागते. त्यामुळे या साधनाप्रकारांमध्ये सर्वसाधारण साधकाचे मन रमणे जरा कठीण असते. याउलट ‘सत्सेवा (सेवा)’ या साधनाप्रकारामध्ये शरीर आणि बुद्धी यांच्याकडून होणार्‍या विविध कर्मांमध्ये (उदा. अध्यात्मप्रसार करणे, ग्रंथासाठी लेखन करणे) साधकाचे मन रमणे तुलनेत सोपे असते. सेवेच्या माध्यमातून साधकाचे मन, बुद्धी आणि अहं यांचा ईश्‍वरचरणी लय लवकर होत असल्याने सेवेच्या माध्यमातून साधकाची आध्यात्मिक उन्नतीही लवकर होते. सेवा म्हणजे साधकांसाठी साधनेसाठीचा जणू प्राणवायूच !

Index and/or Sample Pages

In stock

सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?

20