भारतीय संस्कृती

Original price was: ₹100.Current price is: ₹90.

परंपरागत आदर्श आचार-विचारपद्धती म्हणजे संस्कृती. भारतीय समाजाची हजारो वर्षांपासून चालत आलेली, परंपरागत, आदर्श, उत्तम वाटणारी अशी जी वागणुकीची आणि विचार करण्याची पद्धती तिला भारतीय संस्कृती असे म्हणता येईल.

सर्वसामान्य भारतीय माणसांचा विचारांचा धागा हजारो वर्षांपासून अनुस्यूतपणे व अखंडपणे सारखाच आहे. दुसऱ्याची वस्तू ही आपली नाही, ती आपण संमती न घेता उचलून आणणे ही चोरी आहे, आणि ती चांगली नाही, हे भारतीय चोरालाही मान्य आहे. दारू पिणे निषिद्ध आहे हे भारतातल्या अट्टल दारुड्याला सुद्धा पटते. आई-वडिलांचा आदर करावा, मोठ्या माणसांचा मान राखावा, देव आपल्यावर नित्य नजर ठेवून असतो म्हणून त्याला आवडेल असेच वागावे, देवाला न आवडणारे कर्म म्हणजे पाप, परोपकार हे पुण्यकर्म आहे, कर्तव्य पार पाडणे हे पुण्यकर्म नाही, ते आवश्यक कर्म आहे, इत्यादी विचार भारतातील सर्व जाती-पंथांच्या लोकांना सारखेच पटतात. अशा प्रकारे विचार करणे, या विचारांना आदर्श मानणे, हजारो वर्षांपासून आदर्श मानत राहणे हे भारतीय संस्कृतीचे लक्षण आहे.

Index and/or Sample Pages

In stock

भारतीय संस्कृती

Original price was: ₹100.Current price is: ₹90.

Category: Tag: