Weight | 0.143 kg |
---|---|
ISBN | 978-93-94097-02-5 |
No of Pages | 112 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले |
Group | 27478 |
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे
₹100 ₹90
Also available in: Hindi
परात्पर गुरु डॉ. आठवले आरंभी देवाचा विचार न करणारे होते; परंतु अध्यात्माचे महत्त्व कळल्यावर त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आणि साधना केली. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना शीघ्र गुरुप्राप्ती झाली. यानंतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ते केवळ ३ – ४ वर्षांतच गुरुपदाला पोचले ! यावरून त्यांच्यातील उत्तम शिष्याचे दर्शन घडते. ‘एवढ्या अल्प कालावधीत ते गुरुकृपेस कसे पात्र ठरले ?’, याचे कुतूहल काहींना वाटू शकते. त्यांचे हे कुतूहल या ग्रंथमालिकेवरून शमेल.
संतांच्या आध्यात्मिक जडणघडणीमध्ये ‘त्यांच्या मनाची विचारप्रक्रिया कशी झाली ? लहान-सहान प्रसंगांतूनही गुरूंनी त्यांना कसे शिकवले ? साधकावस्थेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यांमध्ये त्यांच्या साधनेच्या दृष्टीकोनांत कसे पालट झाले ? त्यांनी टप्प्याटप्प्याने तन-मन-धन यांचा त्याग कसा केला ? गुरूंनी त्यांना समष्टी साधनेची शिकवण कशी दिली ?’ इत्यादी अनेक पैलूंच्या बारकाव्यांनिशी लिहिलेले बहुधा कुठे आढळत नाही. साधकांना ही माहिती त्यांच्या साधनेतील शीघ्र प्रगतीसाठी लाभदायक ठरते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेतून हा उद्देश निश्चितच साध्य होईल.

In stock
Reviews
There are no reviews yet.