सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

120 108

प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. जयंत आठवले यांचा ‘शिष्य’ म्हणून स्वीकार केल्यानंतर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! अवघ्या ३ वर्षांनीच गुरु सर्वांसमोर डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोडकौतुक गायला लागले. हे अधिकार, तसेच गुरु अन् काही संत यांनी डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गारही प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत.

आतापर्यंत अनेक संत-महात्मे होऊन गेले. साधकावस्थेपासून ब्रह्मपदाच्या प्राप्तीपर्यंतच्या त्यांच्या साधनाप्रवासात त्यांच्या आंतरिक अवस्थांमध्ये घडलेले पालट, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी इतरांना काहीच कळू शकले नाही. संत अहंविरहित असल्याने स्वतःहून हे सर्व सांगतही नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मात्र साधकांना हे सर्व शिकता यावे, यासाठी ‘स्वतःच्या उन्नतीचे मोजमापन करता येईल’, अशी सूत्रे त्यांच्या साधकावस्थेपासून नोंद करून ठेवली, तसेच यासंदर्भात त्यांनी पुढे सनातनच्या ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले. ही सर्व अमूल्य माहितीही या ग्रंथात अंतर्भूत आहे. हे या ग्रंथाचे निराळेपण आहे.

Index and/or Sample Pages

In stock

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

120 108