कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

80 72

प्रत्येकाच्या आयुष्यात ‘जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे’, ही घटना केव्हातरी घडतेच. पूर्वी एकत्र कुटुंब असायचे. त्यामुळे कुटुंबियांपैकी एखादा गंभीर दुखण्याने रुग्ण झाल्यास त्याला अन्य कुटुंबीय साहाय्य करायचे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन मृत्यूनंतरचे विधी करायचे. प्रस्तुत ग्रंथात उल्लेखलेले अंबरनाथ, जि. ठाणे येथील कुलकर्णी कुटुंबीय (श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांच्या पत्नी सौ. सुजाता आणि त्यांची कन्या कु. तृप्ती) गेली १० वर्षे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहिले. त्यांच्यापैकी सौ. सुजाता कुलकर्णी वर्षभराच्या गंभीर आजारपणानंतर २०.४.२०२० या दिवशी मृत्यू पावल्या. या ग्रंथात ‘सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूला कुलकर्णी कुटुंबियांनी साधकांच्या साहाय्याने कसे तोंड दिले, तसेच कुलकर्णी कुटुंबियांची साधना असल्यामुळे या काळात त्यांनी देवाची कृपा कशी अनुभवली’, हे दिले आहे. सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर, तसेच मृत्यूनंतरच्या विधींच्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षणही ग्रंथात दिले आहे. ते वाचून मृत्यूनंतरची सूक्ष्मातील प्रक्रिया कशी असते, हे लक्षात येते. ‘सौ. कुलकर्णी यांची साधना असल्यामुळे त्यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर झाला’, हे सूक्ष्म परीक्षणातील विवेचनावरून कळते.

Index and/or Sample Pages

In stock

कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

80 72