eBook – कुंभपर्वाचे माहात्म्य (कुंभपर्वक्षेत्रे आणि कुंभमेळे यांच्या वैशिष्ट्यांसह) (Marathi Edition) Kindle Edition

50

Also available in: Hindi
कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकतेचे प्रतीक बनलेली जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा आहे. हा हिंदु धर्मातील विविध पंथ आणि संप्रदाय यांच्या एकतेचा मेळा आहे. जातीव्यवस्था ही वैदिक नाही, हे कुंभमेळा सिद्ध करतो. केवळ पंचांगाद्वारे १२ वर्षांनी एकदा येणार्‍या पवित्र कुंभमेळ्याची माहिती आधीच देऊन कोट्यवधी हिंदूंना आमंत्रणाविना एकत्र करू शकणारा कुंभमेळा नास्तिकवादी संघटनांना चपराक देणारा श्रद्धेचा मेळा आहे. यांसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांविषयी मौलिक विवेचन या ग्रंथात केले आहे.
या ग्रंथात कुंभपर्वाशी संबंधित विविध संज्ञांचा अर्थ, तसेच ‘आखाडा’ म्हणजे काय आणि कुंभमेळ्यात सहभागी होणारे विविध आखाडे, कुंभपर्वक्षेत्रे (प्रयाग, हरद्वार [हरिद्वार], उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक) आणि त्यांचे माहात्म्य, कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, कुंभपर्वाचे धार्मिक महत्त्व विषद केले आहे.
कुंभमेळ्यात श्रद्धेने आचरण करणार्‍या भाविकांनाच कुंभपर्वाचा खर्‍या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो. हा ग्रंथ वाचून भाविकांना कुंभपर्वाचा आध्यात्मिक लाभ कसा करून घ्यावा, हे स्पष्ट होईल.
eBook – कुंभपर्वाचे माहात्म्य (कुंभपर्वक्षेत्रे आणि कुंभमेळे यांच्या वैशिष्ट्यांसह) (Marathi Edition) Kindle Edition

50

Category: