Language | Marathi |
---|---|
Group | 38550 |
eBook – धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
₹99
धार्मिक उत्सव म्हणजे आपल्या जीवनातील अविभाज्य अंग ! होळीसारख्या उत्सवामुळे गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित इत्यादी भेदभाव विसरला जातो. गुरुपौर्णिमेसारख्या उत्सवातील भंडार्यात (अन्नदानात) तन-मन-धन यांचा त्याग होतो. असे विविधांगी महत्त्व असणार्या धार्मिक उत्सवांचा आध्यात्मिक स्तरावरही लाभ व्हावा, या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथात श्रीराम नवमी, नवरात्र, दीपावली यांसारखे अनेक धार्मिक उत्सव साजरे करण्याच्या योग्य पद्धती दिल्या आहेत.
धार्मिक उत्सव साजरे करण्यासह पुण्य देणारी, पापाचे परिमार्जन करणारी, भाग्योदय करणारी व्रतेही आचरण्यास हिंदु धर्माने सांगितली आहेत. या ग्रंथात एकादशी, महाशिवरात्र यांसारख्या काही प्रमुख व्रतांचे उद्देश, व्रत करण्याची पद्धत इत्यादींचे विवेचन केले आहे.
हा ग्रंथ वाचा, त्यानुसार कृती करा आणि आनंद, मांगल्य अन् चैतन्य अनुभवा !
Reviews
There are no reviews yet.