कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार

75 68

Also available in: English

कर्म हे अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्म करतांना व्यक्तीचा इतरांशी सारखा देवाणघेवाण संबंध (हिशोब) निर्माण होत असतो. तसेच प्रत्येक कर्माला पाप-पुण्यात्मक फळ हे असतेच. रागद्वेषादी स्वभावदोष, कुबुद्धी, अधर्माचरण, कर्म करतांना होणाऱ्या चुका इत्यादींमुळे व्यक्तीचे पाप वाढत जाते. त्याचे दुःखरूपी फळ या नाहीतर पुढच्या कोणत्यातरी जन्मात भोगावे लागतेच लागते. असे जन्म-मृत्यूचे चक्र चालूच रहाते. यालाच ‘कर्मबंधन’ म्हणतात. असे असतांना ‘जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटायचे कसे’, याचा मार्ग कर्मयोग सांगतो. कर्मफल नसले, तरच मनुष्य बंधनमुक्त होऊ शकतो. कोणत्याही कर्माविषयी आसक्ती, अभिमान आणि फलाची अपेक्षा न बाळगणे, ‘प्रत्येक कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आहे’, अशा भावाने करणे, कर्म झाल्यावर ते ईश्वरचरणी अर्पण करणे इत्यादींमुळे कर्मात निष्कामता येते. दैनंदिन जीवनात कर्म करत असतांनाच ‘कर्मयोग’ प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन प्रस्तूत ग्रंथमालिका करते.

Index and/or Sample Pages

In stock

कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार

75 68