Weight | 0.147 kg |
---|---|
ISBN | 978-81-89970-29-1 |
No. of Pages | 120 |
Language | Marathi |
Compiler | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली गाडगीळ, सौ. रंजना गडेकर आणि कु. प्रियांका लोटलीकर |
केशरचना कशी असावी ?
₹90 ₹81
या ग्रंथात स्त्रीने ‘पोनी टेल’, ‘फ्रेंचरोल’, ‘बॉयकट’ यांसारख्या असात्त्विक केशरचना का करू नयेत हे सांगतांनाच, लहान मुलींनी दोन वेण्या घालणे, वयातआल्यावर एक वेणी घालणे, स्त्रीने अंबाडा घालणे यांसारख्या सात्त्विक केशरचनांविषयी शास्त्रीय ज्ञान दिले आहे. केशरचनेविषयीसुद्धा एवढा खोलवर विचार हिंदु धर्माने केला आहे, हे पाहून हिंदु धर्मापुढे नतमस्तक व्हायला होते.
सात्त्विक केशरचनांपैकी (उदा. वेणी, अंबाडा) कोणतीही केशरचना स्त्री करू शकते. मात्र या केशरचना सुशोभित करण्यासाठी विचित्र आकारांचे चाप (क्लीप्स्), शोभेची विलायती फुले आदींचा वापर करणे अयोग्य ठरते. स्त्रीने केसात घालण्यासाठी कोणती पाने-फुले वापरावीत, यासंबंधीचे विवरण या ग्रंथात केले आहे. सात्त्विक केशरचना केलेल्या व्यक्तीला आध्यात्मिक लाभ तर होतोच, याव्यतिरिक्त त्या केशरचनेतून सात्त्विक लहरी प्रक्षेपित झाल्याने ती केशरचना पहाणार्याच्या मनोदेहावरही चांगला परिणाम होतो.
In stock
Reviews
There are no reviews yet.