धर्मकार्यासाठी जाहिराती आदी अर्पण मिळविणे, ही समष्टी साधना !

80 72

समाजमन घडवण्यात मोलाचा हातभार लावू शकणारे माध्यम म्हणजे वृत्तपत्रे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने वर्ष १९९९ पासून मुंबईमध्ये वृत्तपत्रासाठी जाहिराती (विज्ञापने) मिळवण्याची सेवा आणि त्यासाठी संपर्क करण्यास आरंभ झाला आणि इतर साधकही मागील काही वर्षांपासून त्या त्या भागातील विज्ञापने मिळवण्याची सेवा करत आहेत. प्रसारात गेल्यावर अनेक सूत्रे विज्ञापने घेणार्‍या साधकांना शिकायला मिळाली. त्यांपैकी पुढील काही सूत्रे या ग्रंथात दिली आहेत.
अ. नियतकालिक छापणे, हे समष्टी साधना करण्याचे उत्तम माध्यम आहे. या सेवेचा एक प्रमुख भाग म्हणजे विज्ञापने मिळवणे
आ. विज्ञापने मिळवणे ही साधना कशी आहे ? विज्ञापने मिळवण्याच्या माध्यमातून साधना होण्यासाठी साधकाच्या अंगी कोणते गुण असणे आवश्यक आहे ? विज्ञापनदात्यांच्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यावीत ?
इ. विज्ञापने मिळवण्याची सेवा परिपूर्ण होण्यासाठी आरंभापासून विज्ञापन छापलेला अंक विज्ञापनदात्यांना मिळेपर्यंत करावयाचे नियोजन इ.