भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)

100 90

साक्षात् परब्रह्मस्वरूप असलेल्या प.पू. बाबांचा सहवास त्यांच्या काही भक्तांना जवळून लाभला. अशाच भक्तांपैकी एक भक्त म्हणजे, कै. चंद्रकांत रामकृष्ण दळवी (दादा दळवी). दादांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची प्रकृती ही भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा सुंदर संगमच होती. दादांनी प.पू. बाबांना वेळोवेळी प्रश्न विचारून किंवा प.पू. बाबांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या विवेचनातून भजनांचे भावार्थ नीट समजून घेतले. दादांनी भावार्थांच्या आशयामध्ये स्वतःच्या लिखाणाची भर घालून, ते सूत्रबद्ध करून, सुगम अन् ओघवत्या भाषेत लिहिले.

प.पू. बाबांनी बहुतांशी भजने ही त्यांच्या तात्कालिन मनोदशेला अनुसरून लिहिली आहेत. ती मनोदशा समजून घेतली, तर भजनांचा अर्थ उकलणे सोपे होते. दादांनी बर्‍याच भजनांच्या ठिकाणी प.पू. बाबांची तात्कालिन मनोदशा वर्णन केलेली असल्याने त्या भजनांचा अर्थ समजणे सोपे झाले आहे. दादांनी काही भजनांच्या ठिकाणी विषयाला समर्पक असे अध्यात्मावर विवेचनही केले आहे. त्यामुळे भजनातील विषय कळायला आणखी साहाय्य झाले आहे. अशा प्रकारे ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि त्यांचा भावार्थ’ यांची ग्रंथमालिका सिद्ध झाली असून प्रस्तुत ग्रंथ हा या मालिकेतील पहिला ग्रंथ आहे.

Index and/or Sample Pages

In stock

भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)

100 90