अमृतमय गुरुगाथा : खंड १ : डाॅ. (सौ.) कुंदा आठवले यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आरंभ आणि त्यांना झालेली गुरुप्राप्ती (गुरु प. पू. भक्तराज महाराजांच्या अमृत महोत्सव सोहळ्यासह)

80 72

डॉ. (सौ.) कुंदा आठवले (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी) यांच्या आध्यात्मिक वाटचालीचा आरंभ आणि त्यासंदर्भात प.पू. मलंग शहा बाबा, प.पू. अण्णा करंदीकर, प.पू. धांडेशास्त्री, प.पू. नाना महाराज तराणेकर इत्यादी संतांशी झालेल्या भेटींचे वर्णन या ग्रंथात दिले आहे. लेखिकेला प.पू. भक्तराज महाराज यांचे झालेले प्रथम दर्शन, त्यांनी लेखिकेला दिलेला गुरुमंत्र, त्यांचे साजरे झालेले विविध गुरुपौर्णिमा उत्सव आदींविषयीचे ग्रंथातील वर्णन तर वाचकाला त्या वेळच्या विश्‍वात घेऊन जाते. संतसहवासातील या सर्व हृद्य आठवणी वाचनीय तर आहेतच, त्याचबरोबर या आठवणी साधनापथावरील प्रत्येकाला काही शिकवणही देतात !

Index and/or Sample Pages

In stock

Category: Tag: