मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

15

Also available in: English , Hindi

मारुतीची महापराक्रमी, भक्त, बुद्धीमान, राजकारणपटू,जितेंद्रिय आदी विविध गुणवैशिष्ट्ये; दासमारुति, वीरमारुति, पंचमुखी, दक्षिणमुखी, वाममुखी आदी मारुतीच्‍या रूपांची अध्‍यात्मशास्त्रीय माहिती; शनि आणि मारुति याच्‍यातील साम्य आणि भेद, यांसारख्‍या विविध सूत्रांविषयी या ग्रंथात विवेचन केले आहे.

‘मारुतीला तेल, शेंदूर आणि रुईची पाने-फुले अर्पण का करावीत ?
नारळ का आणि कसा अर्पण करावा ?
शनीची साडेसाती न्‍यून होण्‍यासाठी मारुतीची पूजा कशी करावी ?’ आदी अध्‍यात्मशास्त्रीय माहितीसुद्धा या ग्रंथात दिली आहे.

स्‍तोत्र अर्थ समजून घेऊन म्हटले, तर अधिक प्रभावी ठरते. यासाठी या ग्रंथात ‘मारुतिस्‍तोत्र’ अर्थासह दिले आहे, तसेच हिंदीतील ‘हनुमानचालिसा’ मराठी भाषेतील अर्थासह दिली आहे. ‘मारुतीची आरती’ अन्वय अन् अर्थ यांसह या ग्रंथात दिली आहे. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्‍यास भाववृद्धी लवकर होते. या सर्वच विवेचनामुळे मारुतीची उपासना भावपूर्ण होण्‍यास उपासकांना साहाय्य होईल !

Index and/or Sample Pages

In stock

मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

15