श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी !

20

Also available in: Hindi

श्री गणेशमूर्ती सात्त्विक, अर्थात धर्मशास्त्रानुसार असेल, तरच गणेशतत्त्वाचा मोठ्या प्रमाणावर लाभ होतो.

सध्या गरुडावर बसलेला गणेश, क्रिकेट खेळणारा गणेश अशा विविध रूपांत अन् मोठमोठ्या आकारांत गणेशमूर्ती बनवल्या जातात. अशा अशास्त्रीय मूर्तींमुळे गणेशतत्त्वाचा लाभ न होता श्री गणेशाचा अनादर मात्र होतो. या अनादरास मूर्तीकार, भाविक अन् गणेशोत्सव मंडळे कारणीभूत ठरतात. या अनादरामुळे हिंदूंना समष्टी पाप लागते.

हे समष्टी पाप लागू नये आणि गणेशोपासना योग्य प्रकारे व्हावी, या हेतूने प्रस्तूत लघुग्रंथात श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार बनवण्याने होणारे लाभ; मूर्तीकार, भाविक, तसेच गणेशोत्सव मंडळे यांनी घ्यावयाची दक्षता आदींविषयी विवेचन केले आहे.

सनातन संस्था-निर्मित गणेशमूर्ती ही सात्त्विक अन् आदर्श कशी आहे, हे सांगून ती बनवण्यासाठी लागणारी आवश्यक मापेही लघुग्रंथात दिली आहेत. या मापांनुसार बनवलेली सात्त्विक श्री गणेशमूर्ती नेहमीसाठीही घरात ठेवणे लाभदायी आहे.

Index and/or Sample Pages

In stock

श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सात्त्विक असावी !

20