टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !

85 77

Also available in: English , Hindi

मुलांनो, आपले प्राचीन ऋषीमुनी वैज्ञानिक होते. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकाशयान (विमान), शरिरावरील शस्त्रक्रिया आदींचे शोध पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या पूर्वी शेकडो वर्षे आमच्या ऋषीमुनींनी लावले आहेत. त्यांनी विज्ञानाचा उपयोग मानवाच्या हितासाठी केला. मोहग्रस्त होऊन तात्कालिक सुखाच्या मागे धावण्याची शिकवण त्यांनी दिली नाही, तर सतत टिकणारा आनंद आणि मनःशांती यांचा शोध घेण्याची शिकवण त्यांनी दिली. यासाठी मुलांनो, दूरचित्रवाणी, इंटरनेट, व्हीडीओ गेम्स आदींचा उपभोग तात्कालिक सुख मिळवण्यासाठी करू नका; कारण त्यांच्या मोहजालात तुम्ही फसत जाल आणि जीवनातील बहुमूल्य वेळ अन् पैसाही गमवाल ! या ग्रंथात दूरचित्रवाणी, इंटरनेट, व्हीडीओ गेम्स आदींमुळे होणारे शारीरिक, मानसिक, राष्ट्रीय, सांस्कृतिक अशा विविध स्तरांवरचे तोटे सांगितले आहेत, तसेच या सर्वांचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी कसा करावा, हेही सांगितले आहे.
मुलांसमवेत बसून पालकांनीही वाचावा, असा हा ग्रंथ आहे !

In stock