आयुर्वेदीय औषधांचे गुणधर्म आणि औषधनिर्मिती

110 99

आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे. रोगांपासून मुक्त होण्यासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्या ज्या द्रव्यांचा उपयोग होतो, ती सर्व द्रव्ये आयुर्वेदीय औषधांमध्ये अंतर्भूत आहेत, असा आयुर्वेदाचा विशाल दृष्टीकोन आहे. आयुर्वेदाने वनस्पतीच्या गुणांचे वर्णन तिच्या मानवी शरीरावर होणार्‍या परिणामांवरून केले आहे, उदा. पिंपळी उष्ण आहे. आवळा शीत आहे. याचा अर्थ पिंपळीचे तापमान जास्त आहे व आवळ्याचे कमी आहे, असा नाही. ते स्पर्शाला उष्ण किंवा शीत नाहीत. शरीरात ज्या अवयवात ते जातील, तेथे ते उष्ण किंवा शीत कार्य करतील. उष्णता दिल्यास बर्फाचे पाणी होते व थंडीत पाण्याचा बर्फ होतो. त्याप्रमाणेच पिंपळी उष्ण असल्याने शरीरातील कफ पातळ होतो, तर आवळ्यामुळे कफ अधिक घट्ट होतो. उष्ण द्रव्ये पेशीत चयापचयाची क्रिया वाढवतात, तर शीत द्रव्ये चयापचयाची क्रिया कमी करतात. उष्ण द्रव्यांनी शरीरातील नलिका रुंद होतात, तर शीत द्रव्यांनी नलिका आकुंचन पावतात.

In stock