प्रार्थना (महत्त्व आणि उदाहरणे)

20

Also available in: English , Hindi

‘उषःकाली प्रार्थनेच्या किल्लीने दिवसाचे दार उघडावे आणि रात्री प्रार्थनेची कडी घालून ते बंद करावे’, असे सुवचन आहे.

दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण मनःशांती हरवून बसतो. ती मनःशांती, तसेच मनःशक्ती प्रार्थनेने मिळते. प्रार्थना केल्यास अशक्य गोष्टीही शक्य वाटू लागतात; कारण तिच्यामुळे श्रद्धेचे बळ मिळते, तसेच ईश्वराचा आशीर्वादही लाभतो.

प्रार्थनेचे महत्त्व वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. ‘प्रार्थनांचा आरोग्यावर सुपरिणाम होतो’, असे जपानी वैज्ञानिक डॉ. मासारू इमोटो म्हणतात. साधना (ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न) करणार्‍यांसाठी तर प्रार्थना हे सतत ईश्वरी अनुसंधानात रहाण्यासाठीचे अनमोल साधनच आहे.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या कृती करतांना; तसेच अभ्यास, व्याधी, सेवा आदी प्रसंगी उपयुक्त ठरणार्‍या सोप्या प्रार्थना या लघुग्रंथात दिल्या आहेत. विद्यार्थी, गृहिणी, वैद्य, कार्यालयीन कर्मचारी, अभियंते, शेतकरी, साधक, राष्ट्राभिमानी अन् धर्माभिमानी अशा सर्वांनाच त्या उपयुक्त ठरतील. त्याचसह दैनंदिन पूजाअर्चा, सण, उत्सव, दिनचर्या, व्याधी (आजार), खरेदी आदी प्रसंगी कोणत्या प्रार्थना करायच्या, हेही या लघुग्रंथातून कळेल.

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available