नामजप कोणता करावा ? (साधनेच्या प्राथमिक ते पुढील अवस्थांत करायचे जप)

65 59

Also available in: Hindi

‘कलियुगात ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी नामजप हे सर्वोत्तम साधन आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. जिज्ञासू आणि नामजप-साधनेला आरंभ करू इच्छिणारे यांनी करायच्या नामजपाविषयी या ग्रंथात सांगितले आहे.

‘वाईट शक्ती’ म्हणजे त्रासदायक सूक्ष्म-देह (लिंगदेह). ‘वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी कोणता नामजप करायचा ?’, याचेही मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. शाळेत जसे पुढच्या पुढच्या इयत्तेत पुढचा पुढचा अभ्यास करावा लागतो, तसे नामजप-साधनेच्या पुढच्या पुढच्या अवस्थांतही निरनिराळे नामजप करावे लागू शकतात. यासंदर्भातही प्रस्तुत ग्रंथ बहुमोल मार्गदर्शन करतो.

या व्यतिरिक्त या ग्रंथात नामजपाचे अन्य काही प्रकार, उदा. ‘ॐ’चा नामजप करणे, इच्छापूर्ती करणाऱ्या देवतेचा नामजप करणे, इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी इंद्रियांच्या देवतांचा नामजप करणे, तसेच सांप्रदायिक नामजपाच्या मर्यादा, नामजपांचे होणारे परिणाम इत्यादी माहितीही दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

नामजप कोणता करावा ? (साधनेच्या प्राथमिक ते पुढील अवस्थांत करायचे जप)

65 59