स्वसंरक्षण प्रशिक्षण

115 104

स्वसंरक्षण करावे, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला स्वतःचे रक्षण अभिप्रेत असते. स्वतःचे रक्षण म्हणजे स्वतःच्या शरिराचे रक्षण ! भारतीय राज्यघटनेने राष्ट्रवासियांना मूलभूत अधिकारांमध्ये स्वतःच्या जीविताचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे. या स्वसंरक्षणाच्या अधिकारात स्वतःचे शरीर अन् संपत्ती यांचे रक्षण, कुटुंबियांचे रक्षण, अपंग, निराधार असलेल्या व्यक्तीचे रक्षण इत्यादी स्वरक्षणाविषयीच्या अधिकारांचा समावेश आहे.
मूठभर दुर्जन संपूर्ण समाजावर सत्ता गाजवत आहेत. या दुष्वृत्तींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच आज त्या सामर्थ्यवान बनल्या आहेत. दंगली, खून, दरोडे इत्यादी घटना दिवसागणिक वाढतच आहेत. देशात त्येक घंट्याला (तासाला) एक बलात्कार होत आहे. दुर्जनरूपी जंतूंनी समाजपुरुषाला पोखरून टाकले आहे. या दुष्टांचा कधी आपल्यावर घाव पडेल, ही वेळ सांगून येणार नाही. त्यामुळे त्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता आताच केली पाहिजे.

Index and/or Sample Pages

In stock