विकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)

90 81

मनुष्याचा देह हा पंचमहाभूतांनी(पंचतत्त्वांनी) बनलेला असल्याने त्याला होणारे विकार हेही पंचतत्त्वांशी संबंधित असतात. देवतांचे कार्य सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवर असते. देवतांच्या निर्गुण स्तराच्या कार्याच्या संदर्भात देवता पंचतत्त्वांच्या पलीकडे आहेत, तर सगुण स्तराच्या कार्याच्या संदर्भात त्या पंचतत्त्वांनी युक्त आहेत. त्यामुळे प्रत्येकच देवतेमध्ये पंचतत्त्वे असतातच. त्यामुळे पंचतत्त्वांशी संबंधित सर्व विकार दूर करण्याचे सामर्थ्य प्रत्येकच देवतेमध्ये असते. असे असतांनाही प्रत्येक विकारासाठी विशिष्ट देवतांचे नामजप देण्याचे प्रमुख कारण म्हणजे, एखाद्या देवतेमध्ये असलेल्या पंचतत्त्वांपैकी एखाद्या तत्त्वाच्या आधिक्यानुसार ती देवता त्या तत्त्वाशी संबंधित विकार अन्य देवतांच्या तुलनेत लवकर बरे करू शकते.

या ग्रंथात पुढच्या पुढच्या टप्प्याचे शब्दब्रह्म(गायत्री मंत्रातील शब्दांचे नामजप), अक्षरब्रह्म(देवतेचे तत्त्व / शक्ती संपुटित झालेल्या अक्षरांचे नामजप), बीजमंत्र आणि अंकजप हेही दिले आहेत.

एखाद्याची प्रकृती, गतजन्मातील किंवा या जन्मातील साधना, आध्यात्मिक पातळी आदींचा विचार करता त्याला पुढच्या पुढच्या टप्प्याचा नामजपही उपयुक्त ठरू शकतो. नामजप-उपाय अधिक परिणामकारक होण्यासाठी करायच्या मुद्रा आणि न्यास यांची माहिती, तसेच नामजपाला कसे बसावे, नामजप भावपूर्ण होण्यासाठी काय करावे आदी उपयुक्त सूचना, नामजपांमुळे दूर होणारे विकार या ग्रंथामध्ये दिल्या आहेत.

In stock